Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, March 1, 2025

ओम काली हिंदवी स्वराज्य सेना यांच्यावतीने "हिंदू धर्मरक्षक पुरस्कार 2025" हा सन्मान पुरस्कार हिन्दुश्री शिवराज (दादा) गायकवाड यांना प्रदान...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

ओम काली हिंदवी स्वराज्य सेना यांच्यावतीने "हिंदू धर्मरक्षक पुरस्कार 2025" हा  सन्मान पुरस्कार हिन्दुश्री शिवराज (दादा) गायकवाड यांना प्रदान... 

सोलापूर (प्रतिनिधी) :- "ओम काली हिंदवी स्वराज्य सेना" यांच्यावतीने आयोजित "हिंदू धर्मरक्षक पुरस्कार 2025" हा असा सन्मान "हिन्दुश्री शिवराज (दादा) प्रकाश गायकवाड" यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार ओम काली स्वराज्य सेनेचे प्रेरणास्थान "कालीपुत्र कालिचरन महाराज" यांच्या हस्ते देण्यात आला.


हिंदू धर्मरक्षक शिवराज दादा गायकवाड हे आपल्या *ओम साई प्रतिष्ठान* महाराष्ट्र राज्य या माध्यमातून गेली अनेक वर्षे शहरी व ग्रामीण भागातील प्रखर हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते यांची जुळणा केली. *हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज* यांच्या प्रेरणेने कुशल व निर्भिड हिंदुत्त्ववादी संघटनेची बांधणी केली, याचं संघटना बांधणीच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागात कार्य करत असताना तेथील गरीब हिंदू समाजाची होणाऱ्या अन्याय व व्यथा बघून तेथील युवकांना त्यांनी उद्योग व्यवसायास प्रेरित केले तसेच त्याभागतील महिला व युवती यांच्या सन्मानाकरिता आरोग्य शिबिर व महिलांच्या अर्थांजणांसाठी  लघुउद्योग व ग्रुहउदयोग त्यांनी सुरू केले. दादांच्या हिंदुत्त्ववादी प्रेरणेतून अनेक युवकांना हिंदुत्त्ववादी कामांकडे प्रेरित केले.




कोरोना काळाच्या अशा भयंकर महामारीमध्ये अनेक गरीब रुग्णांना किराणा माल व वैद्यकीयाची सहायता दादांनी केली, या अशा कर्तव्यदक्ष सामाजिक व हिंदुत्त्ववादी विचारांच्या कार्यांची दखल घेतं दादांना हिंदुत्त्ववादी संघटनांनी सखल हिंदू समाज मंचच्यावतीने *हिंदू समन्वयक* या पदाचे दायित्त्व प्रदान केले. त्याचप्रमाणे *लव जिहाद, लँड जिहाद, गोरक्षण व अशा विविध हिंदुत्त्ववादी मुद्यांवर निवेदन, आंदोलन व मोर्च्याच्या* माध्यमातून सकल हिंदू समाजाचे नेत्रुत्त्व दादांनी केले. अशा असंख्य केलेल्या कार्यांची दखल घेतं ओम काली हिंदवी स्वराज्य सेनेच्या वतीने *धर्मरक्षक 2025* हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.



त्यावेळी ओम काली कालिचरन महाराज, शहर मध्यचे आमदार देवेंद्र दादा कोठे, सुधीर बहिरवाडे, अंबादास गोरंटला, ह. भ. प. सुधाकर (महाराज) इंगळे, हिंदूश्री गिरीराज बाबा बाईग, मनिषजी काळजे मयूर गवते प्रशांत पवार आकाश शिरते नरसु ताई गढवाळकर पंकज काटकर अजिंक्य जाधव यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment