सारा न्यूज नेटवर्क -
अप्पाश्री मित्रपरिवार व पत्रकार कृती समितीच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार व गौरव.
सोलापूर (प्रतिनिधी) :- युवा नेते(रॉकी) बंगाळे यांची बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार पत्रकार कृती समितीच्या वतीने करण्यात आला. त्याचप्रमाणे हनुमंत कुलकर्णी यांची भाजपाच्या राज्य सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.हा गौरवाचा क्षण जिल्हा परिषद बागेत अप्पाश्री मित्रपरिवार व पत्रकार कृती समिती यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी अॅड. विक्रम कसबे, पत्रकार डी.डी.पांढरे,पत्रकार असलम नदाफ, वाहतूक संघटना संयुक्त महासंघ सोलापूर जिल्हाध्यक्ष हजरत(भाई )
शेख व RTI कार्यकर्ते बापूताज पाटील यांचा वाढदिवसानिमित्त उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत तिसरी आंख मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा पत्रकार कृती समितीचे उपाध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे,वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रियाज(भाई) सय्यद,दैनिक शिव-निर्णयचे संपादक अनिल शिराळकर,श्रीराम सेनेचे अध्यक्ष सिद्धराम नांदर्गी, भाजप युवा कामगार मोर्चाचे नितीन करजोळे यांचा समावेश होता.तसेच पत्रकारितेतील मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.यामध्ये एम.डी.24
न्यूजचे संपादक सैपन शेख,
रणनीती न्यूजचे संपादक ईनुस अत्तार,अंतिम न्यायचे शब्बीर मणियार,पत्रकार अकबर शेख,सोलापूर क्रांतीचे संपादक मिलिंद नाना प्रक्षाळ,राज संघर्षचे संपादक लतीफ (भाई) नदाफ,जनता संघर्ष न्यूजचे पत्रकार सिद्धार्थ
भडकुंबे,सोलापूर नगरी न्यूजचे संपादक गिरमल गुरव,संघर्ष यात्रीचे संपादक दशरथ काळे याशिवाय सिद्धार्थ तालीम संघाचे सर्वेसर्वा विनोद वाघमारे, एन भाई, सुरज राजपूत, भारत केदार, विलास सरवदे, नरेंन कांबळे आदी मान्यवरांसह पत्रकार, माहिती अधिकार कार्यकर्ते व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सत्कारसमारंभ आणि वाढदिवस उत्सवात सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment