Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, July 1, 2025

SARA NEWS NETWORK



 सारा न्यूज नेटवर्क - 

मातंग समाज संघांच्या वतीने विविध मागण्याचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन...

सोलापूर (प्रतिनिधी) :- मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य च्यावतीने साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त सोलापूर  निवासी उपजिल्हाधिकारी यांना विविध मागण्याचे देण्यात आले या निवेदनात 


साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती मिरवणुकीत रात्री 12 वाजे पर्यंत परवानगी देण्यात यावी, 

साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात यावा.

तसेच साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त 1 ऑगस्ट रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी,


 या निवेदन पत्रकात नमूद केले आहे, हे निवेदन देण्यासाठी जिल्हा कार्याध्यक्ष आदर्श भैय्या धडे,जिल्हा समन्वयक गिरीधर थोरात,जिल्हाउपाध्यक्ष अवधूत आडकर, शशिकांत उकरंडे मेजर, अनिल उकरंडे शहर अध्यक्ष, जिल्हा कार्यवाहक श्रीकांत बोराडे, मातंग समाज ज्येष्ठ नेते राजु क्षीरसागर, धीरज थोरात आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment