Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, July 2, 2025

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

बळीत मुलगी व आरोपीस पश्चिम बंगाल मधून ताब्यात घेण्यात निर्मल नगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास अथक प्रयत्नानंतर यश ;

मुंबई पोलिसांची दमदार कामगिरी.. 

मुंबई (प्रतिनिधी) :- गुन्ह्यातील हकिकत अशी की, दिनांक ०५/०१/२०२५ रोजी विधीसंघर्षग्रस्त बालिका, वय १३ वर्षे, सदरची मुलगी तिच्या पालकांच्या रखवालीतुन त्यांच्या परवानगी शिवाय कुणीतरी अज्ञात इसमाने फूस लावुन पळवून नेले म्हणुन दिनांक ०७/०१/२०२५ रोजी निर्मलनगर पोलीस ठाणे येथे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा नोंद झाल्यानंतर पोउपनि बनकर (गुन्हे प्रकटीकरण अधिकारी) यांनी मुलगी तिच्या आईचा मोबाईल नंबर वापरत असल्याने तांत्रिक कौशल्याच्या आधारे तपास केला असता, सदर बळीत मुलीस इसम नामे समीर मुस्तफा शेख, वय-१९ वर्षे, रा.ठी. रूम नं. एफ/१४३, कोलसेवाली गल्ली, बेहरामनगर झोपडपट्टी, बांद्रा (पूर्व), मुंबई याने फूस लावुन पळविल्याचे तपासात निष्पन्न झाले.

तपासी अधिकारी पोउपनि बनकर व पोउनि चैधरी यांनी आरोपीचे आई वडील, नातेवाईक, मित्र-मैत्रीणी यांची सखोल चैकशी केली असता कोणाकडून ही गुन्हयाच्या अनुषंगाने उपयुक्त माहिती प्राप्त होत नव्हती. तसेच सदर आरोपीतास मोबाईल व संगणकाचे संपूर्ण तांत्रिक ज्ञान असल्याने आरोपी हा स्वतःच्या मोबाईलचे सिमकार्ड बंद करून फक्त इंटरनेटच्या सहय्याने संपर्क साधत असे, तसेच आरोपी यास क्रिमिनल वेब सिरीज पाहण्याचा छंद असल्याने पोलीस कोण कोणत्या पध्दतीने आरोपीचा शोध कसा घेतात याबाबत त्याने संपूर्ण अभ्यास केला होता, त्यामुळे तो मोबाईलचा वापर टाळत असे व वेळोवेळी ठराविक कालावधीनंतर राहण्याचे ठिकाण दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश व नेपाळ असे बदलत असल्याने आरोपीताचे नेमके ठिकाण मिळण्यात अडचण निर्माण होत होती.

पोउनि बनकर हे माहे मे २०२५ मध्ये पथकासह आरोपीच्या याचे राहते गावी मालदा, पश्चिम बंगाल येथे तपासकामी गेले असता कोणतीही उपयुक्त माहिती मिळाली नाही. आरोपी हा अधून मधून इंस्टाग्राम ही सोशल वेबसाईट वापरत असे त्याची माहिती आय.पी.डी. आर मधून प्राप्त केली असता त्यामध्ये आरोपीने वापरलेला जी. मेल आय.डी ची माहिती प्राप्त केली असता आरोपीने वापरलेला मोबाईलचा आय. एम.ई.आय नंबर व सिम कार्ड नंबर प्राप्त केला. त्याचे लोकेशन राजनगर, मालदा, पश्चिम बंगाल येथील आल्याने यावेळी पोउनि बनकर व पोउनि दौंडकर यांनी पूर्वतयारी करून सदर लोकेशनच्या भौगोलिक परिस्थितीची माहिती घेतली असता सदर परिसर हा गुन्हेगारांचा माहेरघर असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाल्याने, पोउनि बनकर व दौंडकर यांनी स्थानिक परिसरातील दोन पोलीस मित्रांची मदत घेवून राजनगर, मालदा, पश्चिम बंगाल येथे गेले.

पोउनि बनकर व पथकास प्राप्त लोकेशन येथे खाजगी वाहनाने गेले असता स्थानिक लोकांना पथकातील पोलीसांचा संशय आल्याने त्यांनी गाडीला गराडा घालून विचारपूस करू लागले, तेव्हा स्थानिक पोलीस मित्रांनी सदर पथक हे एस. बी. आय बँकेचे कर्मचारी बँकेच्या आँडिट करिता आले असून रस्ता चुकले असलेबाबत सांगितले व तेथून निघुन गेले. त्यानंतर दुसऱ्या  पथकातील पोउनि दौंडकर व पथक यांनी सदर सिम कार्ड चा मोस्ट कॉलर यांना ताब्यात घेवून त्याचा मोबाईल मिळून आला असल्याचे सस्पेक्टेड कॉलर ला फोन करून सांगून मोबाईल घेण्यास बोलविले असता सदर इसम बोलविल्या ठिकाणी मोबाईल घेण्यात आला असता पोउनि बनकर व पथकाने ताब्यात घेतले व त्यास विश्वासात घेवून चैकशी केली असता त्याने आरोपी व बळीत मुलगी हे राहत असलेले ठिकाण सांगितले. त्या ठिकाणावरून पोउनि बनकर व पथकाने आरोपी व बळीत मुलगी यांना सुरक्षितरित्या ताब्यात घेतले.

सलग सहा महिने गुन्हयाचा तपास करीत असताना वेळोवेळी तांत्रिक कौशल्य वापरून मा. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ०८ यांच्या मदतीने व मार्गदर्शनाने आरोपीचा सोशल मिडिया साईट व इतर पोर्टल वर लक्ष केंद्रीत करून तपास सुक्ष्म केला आरोपीचे लोकेशन मालडा, पश्चिम बंगाल येथे प्राप्त झाले. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. रमेश वाघ यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उप निरीक्षक सुदर्शन बनकर, पोलीस उप निरीक्षक विशाल दौंडकर (बी. के.सी पो. ठाणे), गुन्हेप्रकटीकरण पथकासह स्वाना झाले व आरोपी व बळीत मुलगी यांना मालडा, पश्चिम बंगाल येथून सुरक्षित रित्या ताब्यात घेतले.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ८,  श्री. मनिष कलवानिया, सहा.पोलीस  आयुक्त, खेरवाडी विभाग, श्री. प्रकाश चौगुले, व.पो.नि. श्री. रमेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पो.नि.युवराज खाडे, पोउनि सुदर्शन बनकर, पोउनि शैलेश चौधरी, पोउनि विशाल दौडकर (बी.के.सी.पो. ठाणे), 

पो. हवा.क्र. ०३१२८३/अमोल पवार, 

पो.हवा.क्र. ०३१६१३/नेताजी गायकवाड (बी. के.सी.पो.ठाणे), पो.हवा.क्र.०४०८९९/अझिम शेख, 

पो. हवा.क्र.०४०९३३/विनोद माने,

 पो हवा.क्र.०६१४९२/दिगंबर वाघमारे, 

पो.हवा.क्र.०६०८३५/दिपक खंदारे, 

म.पो.शि.क्र.०९३३५९/प्रेमा खंदारे, 

म.पो.शि.क्र.०९१२६२/किरण पोळ,

 पो.शि.क्र.०९००६७/विनोद राठोड, 

पो.शि.क्र. ११३०११/सागर कोयंडे, 

पो.शि.क्र.११३३८६/प्रणव तायडे,

 पो.शि.क्र.१३०३४९/विनायक भोगले, 

पो.शि. क्र.१५११६८/तन्मय खवले, 

तांत्रिक तपासात सहकार्य स.पो.नि दिपक खराडे, 

पो.शि.क्र.०८०३५४/समीर भिंगरदिवे, 

पो.शि.क्र. १५१११९/अनिकेत जाधव, 

सायबर तज्ञ पुष्कर झांटये 

पो.शि.क्र. १११५६२/ सागरगा यकवाड,

 पो.शि.क्र.११०९९७/सुरज भालेराव 

पो.उ.आ कार्यालय, परिमंडळ ८. मुंबई या पथकाने केलेली आहे.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment