सारा न्यूज नेटवर्क -
आषाढी वारीतील उत्कृष्ट नियोजनासाठी मुख्याधिकारी कुलदीप जंगम यांचा पत्रकार कृती समितीच्या' वतीने गौरव!
सोलापूर (प्रतिनिधी) : – पंढरपूरची विठुराया भेटीची आषाढी वारी यंदा अधिक सुयोग्य, सुव्यवस्थित व कोणतीही अडचण न निर्माण करता पार पडली, त्याचे श्रेय मुख्यतः जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या कुशल नेतृत्वाला जाते. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करत पत्रकार कृती समितीच्या वतीने त्यांचा शाल, पुष्पगुच्छ व विठ्ठल-रुक्माईची प्रतिमा देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
मुख्याधिकारी जंगम यांच्या जिल्ह्यातील कार्यकाळातील ही पहिलीच आषाढी वारी असूनही, त्यांनी सर्व यंत्रणा अत्यंत शिस्तबद्ध ठेवत, कोणतीही तक्रार न येऊ देता लाखो वारकऱ्यांना उत्तम सेवा दिली. "वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलसेवा" या ब्रीदवाक्याला खरं करत जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद यांनी एकात्मिक पद्धतीने उत्कृष्ट कामगिरी केली.
वारी दरम्यान आरोग्य, स्वच्छता, पिण्याचे पाणी, महिला व बालकल्याण, बांधकाम, ग्रामपंचायत व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांच्या माध्यमातून प्रत्येक स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे यंदाची वारी कोणतीही अनुचित घटना न घडता अत्यंत शांततेत, भक्तिभावाने व यशस्वीपणे पार पडली.
यावेळी पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अब्दुल रहिम पठाण, उपाध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे, वरिष्ठ पत्रकार सैफन शेख, 'जय हो' चे संपादक विजयकुमार उघडे, कार्याध्यक्ष शब्बीर मनियार, सहखजिनदार युनूस अत्तार, तसेच सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे, रफिक देगनाळकर, कलिम पटेल, अकबर शेख, सिध्दार्थ भडकुंबे, युवराज वाघमोडे, इरफान मंगलगिरी, इक्बाल बागमारु,प्रसाद ठक्का,उपेंद्र गायकवाड,गणेश भालेराव,नुरअहमद तांबोळी,सिकंदर शेतसंदी, इरफान मैंदर्गी,गिरमल्ला गुरव,सिद्धाराम नंदर्गी,गौतम माने,प्रशांत दिलपाक,नितीन करजळे,साजिद मकानदार आणि इतर पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्याधिकारी कुलदीप जंगम यांचा हा सत्कार केवळ त्यांच्या कार्याचे नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याच्या विकास व सुयशाचे प्रतीक ठरला आहे. यामुळे जिल्ह्यात अभिमान व गौरवाची भावना निर्माण झाली असून, पुढील कार्यासाठी सर्वच स्तरातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे


No comments:
Post a Comment