Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, July 1, 2025

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

पत्रकार घरकुल प्रकरणी पत्रकार सुरक्षा समिती बुधवारी घेणार महापालिका आयुक्तांची भेट : प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांची माहिती

अरुण सिडगिद्दी यांच्या नेतृत्वाखाली "पत्रकार घरकुल" ची मागणी करणार 

सोलापूर (प्रतिनिधी) :- पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून समाजातील वंचित घटकासाठी आपल्या दैनिक साप्ताहिक युट्युब व पोर्टल च्या माध्यमातून अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून खरीखुरी पत्रकारिता जपत आपले सामाजिक दायित्व निभावणाऱ्या सोलापूर शहर जिल्ह्यात अनेक पत्रकारांना राहण्यासाठी स्वतः ची पक्की घरे नाहीत सोलापूर शहर जिल्ह्यातील बहुसंख्य पत्रकार आज देखील भाड्याच्या घरात राहत असून अल्प मानधन व तुटपुंजा मिळणाऱ्या जाहिरातीमुळे पत्रकारांना स्वतःची मालकी हक्काची घरे आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने घेता आली नाहीत कोरोना सारख्या जीवघेण्या काळात पत्रकारांनी आपले कुटुंब बाजूला सारून व जीव धोक्यात घालून केवळ राष्ट्रीय कर्तव्य म्हणून केंद्र सरकार राज्य सरकार चे कोरोना संदर्भात असलेले आदेश निर्देश बातम्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचून आपली सामाजिक जबाबदारी आहे पत्रकारांनी पार पाडली आहे स्वतःची पक्की घरे नसलेल्या पत्रकारांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून पत्रकार सुरक्षा समितीने सोलापूर चे जिल्हाधिकारी यांना दिनांक 18/6/2025 रोजी निवेदन सादर करून सोलापूर शहर जिल्ह्यातील पत्रकारांसाठी घरकुल योजना राबविण्याची मागणी करण्यात आली होती.

अरुण सिडगिद्दी यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करणार 

  सोलापूर शहर जिल्ह्यातील स्वतः च्या मालकीची हक्काची घरे नसणाऱ्या पत्रकारांसाठी घरकुल योजना निर्माण करण्यासाठी मा आयुक्त साहेबांनी शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी म्हणून बुधवार दिनांक 2/7/2025 रोजी शहर सचिव अरुण सिडगीद्दी यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करणार असल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी पत्रकारांना दिली आहे.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment