Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, July 23, 2025

SARA NEWS NETWORK


 सारा न्यूज नेटवर्क - 

रणरागिणी फाउंडेशनच्या संस्थापिका रोहिणीताई पवार समाजरक्षक पुरस्काराने सन्मानित...! 


शिर्डी (प्रतिनिधी) :- अहिल्यानगर येथील सामाजिक कार्यकर्त्या व रणरागिणी मल्टीपर्पज फाउंडेशनच्या संस्थापिका सौ.रोहिणी पवार यांनी महिला सशक्तीकरण, सबलीकरण व बचत गटांच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची नोंद घेत राज्यस्तरीय समाजरक्षक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले .


सदर पुरस्कार त्यांना नुकताच शिर्डी येथे आयोजीत अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समितीच्या वतीने सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला . 

सौ.रोहीणी संजय पवार यांनी अहिल्यानगर जिल्हयात शैक्षणिक सामाजिक उद्योजकता विकास महिला सक्षमीकरण महिला सबलीकरण ग्रामविकास बालविकास संस्थेचे कार्य केले आहे. 


महिलांविषयी त्यांना विविध क्लासेस शिकवणे महिलांची वेळोवेळी अडचणीत मदत करत सोडवणे, गृह उद्योग निर्मिती करून देणे त्यांना रोजगार मिळवून देणे , त्यांचे बचत गट स्थापन करून त्यांना बचत गटाच्या माध्यमातून आपण विविध मशिनरी उपलब्ध करून देणे तसेच शाळेमध्ये जाऊन गोरगरीब मुलांना शालेय साहित्य , कपडे वाटप करणे, रक्तदान शिबिर घेणे , हॉस्पिटलमध्ये जाऊन गोरगरीब पेशंट  त्यांना फलाहार देणे, असे सामाजपयोगी कार्य केले आहे . 

या समाजोपयोगी कार्याची नोंद घेत समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप पाटील खंडापूरकर यांचे हस्ते सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले .

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment