सारा न्यूज नेटवर्क -
मराठी माणसाला 'पटक पटक मारू' म्हणणारा विकृत खासदार दुबेची तीन मराठी महिलांनी चांगलीच फे फे उडवली... हा आहे मराठी हिसका.
मुंबई (प्रतिनिधी) :- संसदेत घेराव घालून जाब विचारला मराठीचा अवमान करणाऱ्या या दुबेला सळो की पळो करून सोडले.. भाजपचे मुजोर खासदार निशिकांत दुबे यांना गाठत जाब विचारला, मराठी भाषिकांच्या विरोधातील अरेरावी खपवून घेतली जाणार नाही, असंही दुबेंना सुनावलं
निशिकांत दुबे यांनी "मराठी माणसाला आपटून आपटून मारू" असे संतापजनक वक्तव्य करून संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचा घोर अपमान केला. या विरोधात काँग्रेस पक्षाच्या महिला खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, श्रीमती शोभाताई बच्छाव आणि श्रीमती वर्षाताई गायकवाड यांनी "कोणाला आपटून मारणार?" असा थेट सवाल दुबेंना घेराव घालत विचारला. "जय महाराष्ट्र"च्या घोषणांनी त्यांनी संसदेत मराठी स्वाभिमानाचा आणि अस्मितेचा बुलंद आवाज उमटवला. मराठी मातीचा अपमान आम्ही कदापिही सहन करणार नाही, हे त्यांनी आपल्या ठाम भूमिकेत दुबेना सुनावलं.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment