Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, July 10, 2025

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

 संत रविदास सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.. 


उल्हासनगर (प्रतिनिधी) :-  येथील शारदा विद्या निकेतन प्राथमिक उल्हासनगर १ शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या. 


कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानचे शैक्षणिक सल्लागार श्री सुरेश जी मोरे सर होते तर मंचावर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री गजानंद लिंबोंरे प्रदेश अध्यक्ष श्री पितांबर शिंदे कार्यकारी सदस्य श्री आकाश सोनवणे मुंबई प्रदेश महिला अध्यक्ष सौ छायाताई पगारे उल्हासनगर महिला अध्यक्ष सौ चंदाताई जाधव उल्हासनगर महिला उपाध्यक्ष सोनीताई लिंबोरे, शाळेच्या मुख्याध्यापिका  सौ वर्षा ताई सोनवणे आदी उपस्थित होते. 




कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांना मोफत वह्या  मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले प्रतिष्ठानची रूपरेषा संस्थापक अध्यक्ष श्री गजानन लिंबोरे यानी आपल्या मनोगतातून परिचय करून दिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आश्वासन अध्यक्ष श्री सुरेश मोरे सर यांनी मनोगतातून केले सूत्रसंचालन श्री संभाजी खोसे सर यांनी केले तर आभार सौ वर्षा सोनवणे मॅडम यांनी केले सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment