Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, July 19, 2025

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

 स्वामी विवेकानंद प्रशालेत इंग्रजी भाषा वक्तृत्व स्पर्धा संपन्न..


 *सोलापूर (प्रतिनिधी) : - एम.आय.डी.सी. परिसरातील स्वामी विवेकानंद प्रशालेत*आज शनिवार दि.19 जुलै 2025 रोजी *शाळा स्तरावर*

 *इंग्रजी भाषेतून वक्तृत्व स्पर्धेचे* आयोजन करण्यात आले होते...

 या स्पर्धेत 

#इयत्ता 5वी ते 6वी सहावी, 

#इयत्ता 7वी ते 8वी व 

# इयत्ता 9वी ते 10वी असे तीन गट करण्यात आले होते...

 या तीनही गटातून एकूण 38 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला...



पारितोषिक प्राप्त विद्यार्थी पुढीलप्रमाणे :

 *# इयत्ता 5वी ते 6वी या गटात-* 

1)प्रांजली कोकुल- प्रथम, 

2)शुभ्रा कोडम- द्वितीय,

3)ओंकार कांबळे- तृतीय 

 *#इयत्ता 7वी ते 8वी गटात-* 

1)श्रेया अष्टगी-प्रथम, 

2)हारिका वडीशेरला- द्वितीय,

3)सृष्टी विटकर- तृतीय 

#इयत्ता 9वी ते 10वी या गटात-

1)मोनिका बोलाबत्तीन - प्रथम,

2)साक्षी मांदवाद- द्वितीय,

3)प्रणव कोकुल-तृतीय यांनी पारितोषिके मिळविली...


 बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक *मा.डॉ.हणमंत नारायणकर* यांच्या शुभहस्ते *पुष्पगुच्छ व भेटवस्तू* देऊन अभिनंदन करण्यात आले...



या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रशालेतील सहशिक्षक *मा.खंडू शिंदे* व सहशिक्षिका *मा.मानसी निलंगीकर* यांनी काम पाहिले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रशालेतील सहशिक्षक *मा.सुभाष माने* यांनी मानले...

 या कार्यक्रमास प्रशालेतील सहशिक्षक *मा.सपताळे सर, मा.कोळी सर, मा.राठोड सर, मा.हिंगमिरे मॅडम* व बहुसंख्य विद्यार्थी वर्ग उपस्थित होता...

 बक्षीसपात्र तीनही गटातील विद्यार्थ्यांची *डिस्ट्रिक्ट इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशनच्या* वतीने दि.27 जुलै 2025 रोजी वि.एम.मेहता हायस्कूल येथे होणा-या *शहरस्तरीय इंग्रजी भाषा वक्तृत्व स्पर्धेसाठी* निवड करण्यात आली आहे...

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment