सारा न्यूज नेटवर्क -
मातंग समाज संघ महाराष्ट्र यांच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध मागणीचे निवेदन खासदार प्रणिती ताई शिंदे यांना देण्यात आले.
सोलापूर (प्रतिनिधी) :- मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध मागणीचे निवेदन लोकप्रिय खासदार प्रणिती ताई शिंदे यांना देण्यात आले. यात प्रामुख्याने मागणी अशी आहे की, डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावे, व डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेजयंती निमित्त एक ऑगस्ट शासकीय सुट्टी जाहीर करावी, व सोलापूर शहरांमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात मिरवणूक निघत असल्या कारणामुळे मिरवणूक साठी लागणारा वेळ रात्री 12 पर्यंत देण्यात यावा, या प्रमुख मागण्याची निवेदन माननीय प्रणिती ताई शिंदे यांना देण्यात आले आहे, याप्रसंगी श्रीकांत बोराडे साहेब, शशिकांत उकरंड मेजर साहेब, मातंग समाजाचे नेते राजू क्षीरसागर साहेब, आदर्श भैया धडे मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा कार्याध्यक्ष, व क्रांती सुर्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment