सारा न्यूज नेटवर्क -
पत्रकार घरकुल योजना साठी जागा उपलब्ध करून द्या पत्रकार सुरक्षा समितीचे महापालिका आयुक्त यांना निवेदन..
अनेक पत्रकारांची उपस्थिती..
सोलापूर (प्रतिनिधी) :- पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून समाजातील वंचित घटकासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून खरीखुरी पत्रकारिता जपत आपले सामाजिक दायित्व निभावणाऱ्या सोलापूर शहर जिल्ह्यात अनेक पत्रकारांना राहण्यासाठी स्वतः ची पक्की घरे नाहीत सोलापूर शहर जिल्ह्यातील बहुसंख्य पत्रकार पत्रकार आज देखील भाड्याच्या घरात राहत असून अल्प मानधन व तुटपुंजा मिळणाऱ्या जाहिरातीमुळे त्यांना स्वतःची मालकी हक्काची घरे आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने घेता आली नाहीत कोरोना सारख्या जीवघेण्या काळात पत्रकारांनी आपले कुटुंब बाजूला सारून व जीव धोक्यात घालून केवळ राष्ट्रीय कर्तव्य म्हणून केंद्र सरकार राज्य सरकार चे कोरोना संदर्भात असलेले आदेश निर्देश बातम्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचून आपली सामाजिक जबाबदारी आहे पत्रकारानी पार पाडली आहे स्वतःची पक्की घरे नसलेल्या पत्रकारांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून पत्रकार सुरक्षा समिती वतीने सोलापूर चे जिल्हाधिकारी यांना दिनांक 18/6/2025 रोजी निवेदन देऊन मागणी लावून धरली होती.
पत्रकारांच्या घरकुल योजने संदर्भात पत्रकार सुरक्षा समितीचे निवेदन राज्य सरकारकडे पाठवून पत्रकारांच्या भावना राज्यसरकार ला कळवणार असल्याचे ठोस आश्वासन उपजिल्हाधिकारी यांनी पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळाला दिलं होतं
सोलापूर शहर जिल्ह्यातील स्वतःची मालकीची घरे नसणाऱ्या पत्रकारांच्या घरकुल संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार पालकमंत्री जयकुमार गोरे त्याचबरोबर विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा करणार सोलापूर शहर जिल्ह्यातील स्वतःच्या मालकी हक्काची घरे नसणाऱ्या पत्रकारांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याची ग्वाही पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश यशवंत पवार यांनी यावेळी पत्रकारांना दिली आहे. स्वतः च्या मालकी ची घरे नसणाऱ्या सोलापूर शहर जिल्ह्यातील पत्रकारांना घरकुल योजना बाबत जागा उपलब्ध करून देण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळा ने सोलापूर चे महानगर पालिका आयुक्त यांना निवेदन सादर केलं असून पत्रकारांच्या घरकुल योजना बाबत जातीने लक्ष घालण्याची विनंती केली आहे
यावेळी पत्रकार सुरक्षा समिती कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सरवदे मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड सोलापूर जिल्हा संघटक सादिक शेख जिल्हा सचिव अंबादास गज्जम जिल्हा उपाध्यक्ष कलीम शेख सोलापूर शहर अध्यक्ष अन्सर तांबोळी (बी एस ) शहर अध्यक्ष( महिला विभाग) रक्षंदा स्वामी शहर सचिव अरुण सिडगिद्दी दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद योगेश स्वामी सतीश गडकरी इम्रान आत्तार लक्ष्मीनारायण भंडारी प्रभाकर सग्गम इत्यादी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment