सारा न्यूज नेटवर्क -
प्रवीण गायकवाड यांचेवरील हालल्याचा भीम शक्ती कडून निषेध, मोकोका लावण्याची मागणी..
सोलापूर (प्रतिनिधी) :- दि 13/7/25रोजी संभाजी ब्रिगेडचे प्रफेश अध्यक्ष प्रवीण गायकवाफ हे अक्कलकोट या ठिकाणी एका कार्यक्रमासाठी आले असताना अचानक पणे भा ज पा चे विभागीय पदाधिकारी दीपक काटे आणि त्यांचे सहकारी यांनी प्रवीण गायकवाड यांना काळे फासून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला या कृत्याचा भीम शक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून दीपक काटे हा एक सराईट गुनेहागार असून त्याच्यावर मोकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी भीम शक्ती सामाजिक संघटनेचे वतीने सोलापूर निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले भीम शक्ती संघटनेचे नेते मा चंद्रकांत हंडोरे साहेब यांच्या आदेश नुसार हे निवेदन देण्यात आले आहे या
मध्ये दीपक काटे याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून जानेवारो 2025 मध्ये पुणे विमानतळवर त्यांच्या जवळविना परवाना 8जिवंत काडतूस आणि पिस्टोल सापडले तरी सुद्धा त्याच्यावर कोणतीच कडक कारवाई केली गेली नाही याचा अर्थ असा आहे कि फडवणीस सरकारच अश्या लोकांना मदत करीत आहे हे स्पस्ट झाले आहे त्या भाजपचा खरा चेहरा जाणते समोर आला आहे तेव्हा फडवणीस सरकाने दीपक काटे याच्यावर मोकोका अंतर्गत कारवाई करावी अन्यथा भीम शक्ती रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे निवेदनामध्ये सांगितले आहे या निवेदनावर सुबोध वाघमोडे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ कदम पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस उमेश सुरते प्रमिला ताई तुपलोंढे महिला जिल्हा अध्यक्ष ज्योती ताई गायकवाड मेजर साबळे के एम कांबळे विक्रम वाघमारे यांच्या सह्या आहेत इब्राहिम शेख समीर मुजावर मयूर टाळभंडारे अनिता भालेराव जयकुमार कांबळे मीना गायकवाड मुमताज तांबोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment