Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, July 7, 2025

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

मा. शेखर भाऊ मुंदडा, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे दोन वर्षे पूर्ण.. 

पुणे (प्रतिनिधी) :- आदरणीय शेखर भाऊ मुंदडा, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे दोन वर्षे पूर्ण केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत गोसेवेच्या क्षेत्रात ऐतिहासिक कार्य झाले आहे. गोमातेला ‘राज्यमाता’चा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय असो, परिपोषण योजनेद्वारे गोवंशाच्या अन्न, पाण्याची सोय असो, की सुधारित गोवर्धन गोवंश योजनेद्वारे देशी गायींच्या संवर्धनासाठी राबवलेले उपाय – या सर्वांनी महाराष्ट्रात गोवंशसंवर्धन चळवळ अधिक बळकट केली आहे.


२२ जुलै हा ‘शुद्ध देशी गोवंश संवर्धन व जतन दिवस’ साजरा करून देशी गायींचे महत्त्व जनमानसात पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. त्याचबरोबर, ‘अक्षयतृतीया’ दिवशी गोमय उत्पादन विक्री दिवस राबवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना दिली.


त्यांच्या या धडाडीमुळे आणि दूरदृष्टीमुळे गोसेवा ही केवळ परंपरा न राहता ती शाश्वत विकासाचा भाग बनत आहे. येणाऱ्या काळातही महाराष्ट्राला गोवंश संवर्धन व गोमातेला केंद्रस्थानी ठेवून सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय परिवर्तन साधण्याचे त्यांचे कार्य यशस्वी व्हावे, हीच मनापासून शुभेच्छा! 💐

जय गोमाता! जय महाराष्ट्र !

अमोल उंबरजे

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment