सारा न्यूज नेटवर्क -
सह्याद्री फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नेताजी खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त बोरामणी येथे वह्यांचे वाटप..
सोलापूर (प्रतिनिधी) :- उळे गावचे उपसरपंच तथा सह्याद्री फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नेताजी(भाऊ)खंडागळे यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त बोरामणी जिल्हा परिषद शाळा,जिल्हा परिषद शाळा मोहोळकर तांडा,जिल्हा परिषद शाळा चिरका वस्ती जिल्हा परिषद शाळा मलिक तांडा येथे वह्यांचे वाटप करण्यात आले.
त्यावेळी नेताजी भाऊ खंडागळे यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला आणि भावी वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आले.
याप्रसंगी बोरामणी ग्रामपंचायत तर्फे ग्रामपंचायत कार्यालयात नेताजी भाऊ खंडागळे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी गावच्या सरपंच अरुणा राज साळुंखे, राज साळुंखे, उपसरपंच वैभव हलसगे, ग्रामपंचायत सदस्य आकाश माशाळे, मुन्ना पठाण, सैफन फुलारी, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
त्यावेळी गावचे सरपंच राज साळुंखे,उपसरपंच वैभव हलसगे, ग्रा.पं. सदस्य आकाश माशाळे,शाळेचे मुख्याध्यापक बनजगोळे सर,केंद्रप्रमुख व्हनमाने सर*,सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे



No comments:
Post a Comment