सारा न्यूज नेटवर्क -
गुरूपौर्णिमेनिमित्त श्री पंचायतन गणेश मंदिरात सूर्यमणी दर्शन; श्रीमंत मालोजीराजे तिसरे यांच्या पुढाकाराने आयोजन..
अक्कलकोट (प्रतिनिधी) :- १० जुलै २०२५: गुरूपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटच्या जुना राजवाडा परिसरातील श्री पंचायतन गणेश मंदिरात सूर्यमणी दर्शनाचा भव्य सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला. अक्कलकोटचे राजेसाहेब श्रीमंत मालोजीराजे (तिसरे) संयुक्ताराजे भोसले यांच्या पुढाकाराने आयोजित हा उपक्रम यंदा सलग चौथ्या वर्षी पार पडला. या पवित्र दिवशी सूर्यमणीच्या दर्शनासाठी अक्कलकोटसह राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने येथे आले होते.
या विशेष सोहळ्याला मिरजच्या राजघराण्याचे माननीय श्रीमंत माधवराजे पटवर्धन यांची उपस्थिती लाभली. विविध मान्यवर, संतभक्त आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत हा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत श्रद्धेने पार पडला.
या निमित्ताने श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी ‘अनुभूती’ या भव्य प्रकल्पाची माहिती सर्वांसमोर मांडली. श्री अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्टच्या माध्यमातून राबवण्यात येणारा ‘अनुभूती’ हा प्रकल्प अक्कलकोटच्या आध्यात्मिक, सामाजिक व भौतिक विकासासाठी एक महत्त्वाकांक्षी पाऊल ठरणार आहे.
या प्रकल्पात राम तलावाच्या मध्ये श्री स्वामी समर्थांची १०८ फूट उंच भव्य मूर्ती उभारण्यात येणार आहे. या मूर्तीच्या एका बाजूला पंचकर्मा आरोग्य केंद्र, तर दुसऱ्या बाजूला फूड कोर्ट उभारले जाणार आहे. राम तलावाच्या किनाऱ्यावरच एक ऍम्फीथिएटर म्हणजे मुक्तनाट्यगृह साकारण्यात येणार आहे, जेथे सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रम होणार आहेत.
या प्रकल्पात एक मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल, भक्तनिवास, सार्वजनिक बागा, तसेच ‘दिव्य दर्शन’ नावाची एक भुयारी गुहा प्रणाली उभारली जाईल, ज्यामध्ये श्री स्वामी समर्थांच्या जीवनातील प्रसंग चित्रमय स्वरूपात मांडले जातील. तसेच, 'कुंजरबन' नावाचा एक विशेष परिसर साकारण्यात येणार आहे, जो अक्कलकोटच्या राजघराण्याच्या हत्तींसाठी समर्पित असेल.
या सर्व उपक्रमांमुळे अक्कलकोट केवळ एक आध्यात्मिक स्थान न राहता, एक संपूर्ण सांस्कृतिक, आरोग्यविषयक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून विकसित होणार आहे.
श्रीमंत मालोजीराजें च्या दूरदृष्टीमुळे अक्कलकोटच्या भवितव्यातील एक नवा अध्याय लिहिला जात असून, 'अनुभूती' प्रकल्प हे त्या दिशेने एक भक्कम पाऊल ठरत आहे.
सूर्यमणीचे दर्शन हा अक्कलकोटच्या अध्यात्मिक परंपरेचा एक मौल्यवान भाग ठरत असून, राजघराण्याच्या सततच्या प्रयत्नांमुळे ही परंपरा अधिक व्यापक आणि भाविकांपर्यंत पोहोचणारी ठरत आहे. राजवाडा प्रांगणातील हे आयोजन स्थानिक संस्कृती, श्रद्धा आणि परंपरेचे प्रतीक बनले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजघराणे, स्थानिक स्वयंसेवक आणि प्रशासन यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी उपस्थित सोलापूरचे पोलिस अधीक्षक सो मा.अतुल कुलकर्णी , पोनि महेश स्वामी, पोनि राहुल डोंगरे,ॲड सयाजी राजे भोसले,आशिष कदम, श्री शिवराज म्हेत्रे, शितल ताई म्हेत्रे,नितीन अणवेकर, ॲड.शुभम वडणे,कोल्हापूरचे इंद्रजीत मंडलिक,सोलापूरचे स्त्री रोग तज्ञ डॉक्टर प्रियदर्शनी कादे, ययाती साटम, ॲड प्रतीक तावरे, जयसिंह पाटील, शक्ती टोणे, सातारचे उद्योगपती अमित जाधव,रवी महाडिक, अभिषेक शेजाळे, सौ. पूजा चौबळ, सप्तेश चौबळ, स्वप्निल गायकवाड श्रेयांशू कोठे, प्रकाश जमादार, स्वप्निल कटारे, अमोल भामरे, शुभम मोरे, अभिषेक काकडे, उत्कर्ष उकरंडे, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक अशोक पाटील, तेजस दंडगव्हाळ, अतुल तेरकर, मालबा लोंढे, मंजिरी कुलकर्णी, महेश हिंडोळे, शशिकांत लिंबी तोटे, उद्योगपती श्रेयस मुनाळे, गणेश दिवाणजी, चिदानंद उपाध्ये, तम्मा शेळके, राज यादव, आरती काळे मॅडम, सिद्धार्थ बिंदगे, श्रीपाद पुजारी, मल्हारी शिंदे, शेकप्पा माने, ओंकार जाधव, श्रीकांत उपासे, पिंटू फुले,अभिजीत पवार, नागेश घोडके, रोहित हिरतोट,गावातील व्यापारी वर्ग, महाराष्ट्रातील स्वामी भक्त, सर्व पत्रकार बंधू, सर्व पोलीस बंधू, राजवाडा मधील सर्व स्टाफ व आदी मान्यवर उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे



No comments:
Post a Comment