Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, July 25, 2025

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

जिल्हा परिषद अनुकंपा भरती प्रक्रियेत पारदर्शकता;१२४ उमेदवारांची यशस्वी निवड.

सोलापूर (प्रतिनिधी) :- जिल्हा परिषद सोलापूरच्या अनुकंपा भरती प्रक्रियेत गुरुवारी (ता. २४) पारदर्शकतेचा आदर्श निर्माण करण्यात आला. सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत झालेल्या समुपदेशनाद्वारे एकूण ११ संवर्गांमधून १२४ उमेदवारांची भरती करण्यात आली. या प्रक्रियेबाबत सर्व स्तरांतून समाधान व्यक्त होत असून, जिल्हा परिषदेच्या कारभारात पारदर्शकतेचा हा सकारात्मक पायंडा ठरला आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी १० वाजता समुपदेशनास सुरुवात झाली. 


याआधी, जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने २५७ जणांची प्रतिक्षा यादी जाहीर केली होती. त्यामधील १४० उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते.अनुकंपा भरती ही संवेदनशील प्रक्रिया असल्याने अर्ज छाननी, यादी प्रसिद्धी आणि प्रत्यक्ष समुपदेशन हे सर्व टप्पे पारदर्शक पद्धतीने राबवण्यात आले. कोणत्याही प्रकारचा संभ्रम न ठेवता सर्व माहिती उमेदवारांना वेळेवर आणि स्पष्ट स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली. परिणामी, उमेदवारांनी समाधान आणि विश्वास व्यक्त केला.

सायंकाळी उशिरा ही प्रक्रिया पूर्ण झाली असून, ११ संवर्गांतून १२४ जणांची निवड न्याय्य व पारदर्शक पद्धतीने करण्यात आली आहे.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment