सारा न्यूज नेटवर्क -
ग्लोबल व्हिलेज शिक्षण संकुल, बोरामणी येथे नेताजी (भाऊ) खंडागळे यांची सदिच्छा भेट..
सोलापूर (प्रतिनिधी) :- बोरामणी ग्लोबल व्हिलेज शिक्षण संकुल, येथे सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष व उळे गावचे उपसरपंच नेताजी (भाऊ) खंडागळे यांनी सदिच्छा भेट दिली.
या भेटीदरम्यान, संकुलातील विविध शैक्षणिक व कौशल्यविकास उपक्रम, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित इनोव्हेशन लॅब, आयटी ट्रेनिंग, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठीचे विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आदींबाबत सविस्तर माहिती घेतली.
या प्रसंगी जिल्हा परिषदचे वरिष्ठ अभियंता मा. राजेश जगताप साहेब व संस्थेचे शिक्षकवृंद उपस्थित होते.
सत्कार समारंभामध्ये ग्लोबल कॉलेजचे उपाध्यक्ष प्रा. अनिकेत चनशेट्टी सर यांनी नेताजी भाऊ यांचा शाल, विद्यार्थ्यांनी 3D प्रिंटरने तयार केलेली गणेश मूर्ती व नेपकिन बुक देऊन सन्मान केला.
आगामी काळात सह्याद्री फाउंडेशन आणि ग्लोबल कॉलेज शिक्षण संकुल एकत्र येऊन शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवतील, असा दृढ संकल्प या भेटीत करण्यात आला.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment