सारा न्यूज नेटवर्क -
रोटरी क्लब तर्फे गुरु पौर्णिमा दिनी गुरुजींचा व डॉक्टरांचा सन्मान..
सोलापूर (प्रतिनिधी) :- रोटरी क्लब ऑफ सोलापूर ईस्ट,आयोजित डॉक्टर डे व गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने डॉक्टर व गुरूंचा सन्मान सोहळा साजरा करण्यात आला.
सदरील कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ सोलापूर ईस्ट चेअध्यक्ष रो.श्री कार्तिक चव्हाण सर व सचिव रो.डॉ. मनोज देवकर तसेच प्रमुख अतिथी जेष्ठ पत्रकार डॉ. अरविंद जोशी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.आजच्या काळात डॉक्टर आणि शिक्षक यांचे सामाजिक योगदान व त्यांचे महत्त्व व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी.डी.जी. रो.श्री मोहन देशपांडे यांनी केले. पी.डी.जी.डॉक्टर मेतन, रो.डॉक्टर नवनीत तोष्णीवाल, रो.डॉक्टर संजय मंठाळे, सहशिक्षक श्री मुजिब अतार सर, श्रीकांत कदम सर, श्री बापूसाहेब माने, श्री राहुल पोटफोडे, श्री जाधव सर, श्री धर गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला. सदरील कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ सोलापूर ईस्ट चे माजी अध्यक्ष रो श्री सचिन जोशी उपाध्यक्ष श्री निलेगावकर रो.सदस्या शिरसाट मॅडम आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे




No comments:
Post a Comment