सारा न्यूज नेटवर्क -
दुचाकी गाडी चोरीच्या गुन्ह्यातून आरोपी डिस्चार्ज/ दोषमुक्त
- सोलापूर जिल्हा न्यायालय
सोलापूर (प्रतिनिधी) :- हकीकत अशी की, रूपा भवानी मंदिरापासून दुचाकी गाडी चोरल्याच्या आरोपामध्ये जोडभावी पेठ पोलीस स्टेशन यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपी मनोज राठोड याच्याविरुद्ध मेहेरबान. न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते .
तसेच सदरची केस हे मेहरबान. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांचे समोर आल्यानंतर यातील आरोपी मनोज राठोड यांनी ॲड. विक्रम वाघमारे यांच्यामार्फत गुन्ह्यामधून दोषमुक्त करण्याकरिता अर्ज केला. सदरच्या अर्जामध्ये आरोपीतर्फे युक्तिवाद करताना आरोपी हा सदरच्या गुन्ह्यामध्ये सहभागी नव्हता तसेच त्याच्याविरोधात कोणताही पुरावा नसल्याचे मेहरबान . न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मेहरबान. न्यायालयाने गुन्ह्यातून दोष मुक्त करण्यासाठी केलेला अर्ज मंजूर केला. व सदर गुन्ह्यातून आरोपीस डिस्चार्ज/दोषमुक्त केले. सदर केसचे कामकाज हे आरोपीच्या वतीने ॲड. विक्रम वाघमारे, ॲड. स्नेहल शिवपूजे व ॲड. आकाश बंगाळे यांनी काम पाहिले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment