सारा न्यूज नेटवर्क -
जो राखतो कायद्याचा मान त्याचा आम्ही करू सन्मान चोरी घरफोडी रोखण्या बरोबर गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी प्रयत्न करणार वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांचं प्रतिपादन
सोलापूर (प्रतिनिधी ) :- फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री महादेव राऊत यांनी नुकताच पदभार घेतला असून पत्रकार सुरक्षा समिती वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री महादेव राऊत यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा ही देण्यात आल्या यावेळी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्न करणार असून जो करतो कायद्याचा सन्मान आम्ही राखू त्यांचा मान या म्हणी प्रमाणे वरकरणी जरी शांत संयमी व मितभाषी वाटत असले तरी तितकेच कणखर व कडक शिस्तीचे असल्याचा अनुभव पत्रकारांना आला आहे फौजदार चावडी पोलीस स्टेशन हद्दीत अनेक ठिकाणी नगरे वसाहती आपारमेंट व इमारती असून लाखो रुपये खर्च करून मोठ-मोठे घरे बांधणाऱ्या लोकांनी आपल्या सुरक्षेसाठी वॉचमन ठेवावा तसेच सीसीटीव्ही चा वापर करावा घरफोडी करणारे गुन्हेगार हे मध्यरात्रीत चोऱ्या करत असतात अशा घर पुढे करणाऱ्या चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असले तरी नागरिकांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी पत्रकारांची वार्तालाप करताना केलं आहे सज्जनांचा आधार तर गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हूणन फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी आपण मोडून काढू त्याच बरोबर शांतता व जातीय सलोखा अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी यावेळी सांगितले आहे
याप्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद महाराष्ट्र पोलीस वार्ता न्यूज चे संपादक अमोल कुलकर्णी साप्ताहिक कार्यसम्राट चे ज्येष्ठ पत्रकार अरुण सिडगिद्दी सुहास कुलकर्णी सागर संब्बन साठे सतीश गडकरी रमेश अपराध इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment