सारा न्यूज नेटवर्क -
संत रविदास चर्मकार युवा महासंघाचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष राधेश्याम बरय्या यांच्या प्रयत्नांना यश...
-----------------------------------------------
गडचिरोली (प्रतिनिधी) : - अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री डॉ. राजे धर्मराव बाबा आत्राम यांना संत रोहिदास महाराज सभागृहाच्या बाबतीत मागणी, निवेदन द्वारे चर्चा करण्यात आली होती, यावर स्वतः धर्मराव बाबा अत्राम यांनी मी केलेल्या मागणीचा पाठपुरावा करून स्वतः लक्ष टाकून समाज कल्याण मंत्री संजयजी सावकारे साहेब व गडचिरोली जिल्ह्याचे सह पालक मंत्री ऍडव्होकेट आशिषजी जयसवाल यांच्या माध्यमातून चोप, वीसोरा, आमगाव, कोरेगांव, बोळधा, कसारी, कोकडी, पोटगाव, विहिरगाव, सावंगी, या गावांसाठी निधी उपलब्ध करून दिला, बद्दल सर्व चर्मकार समाज बांधवांच्या वतीने समाज कल्याण मंत्री संजयजी सावकारे साहेब, गडचिरोली जिल्ह्याचे सह पालक मंत्री ऍडव्होकेट आशिषजी जयसवाल, व माजी मंत्री डॉ. राजे धर्मराव बाबा आत्राम यांचे मनापासून आभार व धन्यवाद.
तसेच या मोलाच्या कार्यासाठी रविजी गर्जे साहेब मुंबई तसेच राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष नानाभाऊ नाकाडे, संत रविदास चर्मकार युवा महासंघ महाराष्ट्र राज्य संस्थापक/अध्यक्ष दत्ताभाऊ कदम, राज्य महासचिव ज्ञानदेवजी कदम, प्रदेशाध्यक्ष देवप्पा शिंदे, राज्य सल्लागार रमेश शिंदे यांचे ही खूप मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
सदर गावांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आदरणीय आत्मारामजी सूर्यवंशी, व चोप ग्राम पंचायतीचे सरपंच नितीनजी लाडे, राका कार्यकर्ते यांचे राधेश्याम बरय्या यांनी जाहीर आभार मानले...
संत रोहिदास महाराज सभागृहासाठी निधी मंजूर झाल्याबद्दल सर्व चर्मकार बंधूंमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे....
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment