Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, July 27, 2025

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

शिवसेना लोणावळा शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा...!ं


लोणावळा (प्रतिनिधी) :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री.उद्वव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना लोणावळा शहराच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक लोणावळा शहर इथे "गरजु व्यक्तींना फळे वाटप करण्यात आली."


यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शिवसेना पुणे जिल्हा संघटक.मा.श्री.बाळासाहेब फाटक म्हणाले की पक्षप्रमुख यांनी कोवीड काळात उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांच्या मनात योग्य ते स्थान निर्माण केले आहे. तसचे माजी युवासेना पुणे जील्हा चिटणीस श्री शाम सुतार यांनी शुभेच्छा देताना सांगितले की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आजसुद्धा शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे चं ८०% समाजकारण आणि २०% राजकारण या विचाराने प्रेरित होऊन आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना लोणावळा शहराच्यावतीने  गरजु लोकांना फळे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे.



यावेळी प्रमुख उपस्थित शिवसेना महिला आघाडी. 

पुणे जिल्हा सह-संपर्कप्रमुख श्रीमती शादान भाभी चौधरी, शिवसेना पुणे जिल्हा संघटक बाळासाहेब फाटक,शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिषभाऊ ठोंबरे,शिवसेना लोणावळा शहरप्रमुख- परेश बडेकर,शिवसेना तालुका संघटक एकनाथ जांभूळकर,*शिवसेना तालुका सल्लागार मारुती खोले,शहर सल्लागार रामभाऊ थरकुडे, महिला आघाडी संघटीका प्रतीभाताई कालेकर,मा.युवतीसेना अधीकरी सना चौधरी साळुंके, उपशहरप्रमुख नरेश काळवीट,नागेश दाभाडे,विभागप्रमुख संजय शिंदे, युवा नेते धीरज घारे,शाखाप्रमुख जितेंद्र ठोंबरे,सुनिल जाधव,गणेश फरांदे, जेष्ठ शिवसैनिक शंकर नानेकर,रमेश जाधव आदी आजी माझी पदाधीकारी,कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे 



 


No comments:

Post a Comment