सारा न्यूज नेटवर्क -
कामगाराच्या मृत्यूप्रकरणी व्यापाऱ्याला अटक..
उल्हासनगर (प्रतिनिधी) : - कॅम्प नं ३, फर्निचर मार्केटमधील माया होटेल वाणिज्य इमारतीचा सज्जा कामगारांच्या डोक्यावर पडून त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी महेश जयसिंग साधवानी याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली.
उल्हासनगरात फर्निचर मार्केटमध्ये ३० वर्षे जुनी असलेली वाणिज्य इमारत रिकामी असून इमारतीच्या साफसफाई व दुरुस्तीचे काम सुरू केले होते. साफसफाईवेळी रविवारी साडेचार वाजता खिडकीचा सज्जा रावसाहेब ननावरे काम करत असताना त्याच्यावर पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. ननावरे यांच्या कुटुंबानी संबंधितावर कारवाईसह नुकसान भरपाईची मागणी केली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी महेश जयसिंग साधवानी या व्यापाऱ्याला जबाबदार धरून गुन्हा दाखल करत त्यास अटक केली.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment