Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, July 14, 2025

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

चर्मकार समाजाच्या विविध संघटना पदाधिकाऱ्यांचा नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश.. 

मुंबई (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग, बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून चर्मकार समाजातील असलेली कामे मार्गी लागतील. नामदार राणे यांची कार्य पद्धती सर्वश्रुत आहे. गावातील, वाडी वस्तीतील स्मशान भूमी, समाज मंदिर, रस्ते यासारखे बरेच प्रश्न अजून प्रलंबित आहेत चर्मकार समाजासाठी असलेल्या विविध कामांची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्यवस्थित रित्या करून समाजहीत साधण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे नेहमीच आमच्या समाजासोबत असतील हा विश्वास असल्यामुळे भाजपा मध्ये पक्ष प्रवेश करत आहोत. असे संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था मुंबई महाराष्ट्र राज्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय कदम यांनी सांगितले. नामदार नितेश राणे यांच्या वतीने ओम गणेश बंगला कणकवली येथे संजय कदम यांच्यासह चर्मकार समाजातील विविध संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी 13 जुलै रोजी भाजपा मध्ये प्रवेश केला. त्यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, भाजपा युवा मोर्चा जिह्वाध्यक्ष संदीप मेस्त्री यांची प्रमुख उपस्थिती होती. संजय कदम यांच्या पक्ष प्रवेशाला पाठिंबा देत भागीरथी भोईर प्रतिष्ठान महाराष्ट्र चे अध्यक्ष दिनेश भोईर यांनीही त्यावेळी भाजपात पक्ष प्रवेश केला. संजय कदम यांच्यासोबत सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ चे कणकवली तालुका अध्यक्ष महेंद्र चव्हाण, युवा संकल्प प्रतिष्ठान चे अध्यक्ष आनंद चव्हाण,अमित चव्हाण सांगेली,संदीप चव्हाण म्हापन, प्रशांत निरवडेकर, अरुण चव्हाण, अमोल चव्हाण, दीपक परब, योगेश परब, सागर चव्हाण, प्रवीण कदम, सीताराम जाधव, राजू आंब्रडकर, दिपेश चव्हाण, संतोष जाधव, सौ. मयुरी चव्हाण, सुजाता, कदम, स्मिता चव्हाण, प्रियांका कदम, प्रिया निरवडेकर, काजल कदम, प्रशांत फोंडेकर, प्रशांत जाधव, अनिरुद्ध जाधव, विशाल कदम, अरुण चव्हाण आंबोली, प्रसाद चव्हाण आदींनी भाजपा मध्ये पक्ष प्रवेश केला.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment