सारा न्यूज नेटवर्क -
कार्य शिवसेनेचे..! काम समाजहिताचे...!
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, लोणावळा शहर यांच्या वतीने लोणावळा नगरपरिषद मुख्य अधिकारी यांना निवेदन सादर..
लोणावळा (प्रतिनिधी) :- आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लोणावळा शहर यांच्या वतीने खंडाळा विभागातील पुढील विषयाबाबत लोणावळा नगरपरिषद मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात खालील विषय देण्यात आले..
१. लोणावळा नगरपरिषद माध्यमीक शाळा खंडाळा येथील रस्त्यावर शौचलायचे सांडपाणी जात असल्याने विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोय.
२. खंडाळा तलावात साचलेला कचरा साफसफाई करण्याबाबत तसेच गौरी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तलावाची साफसफाई वेळेवर करण्यातबाबत.
३. खंडाळा विभागातील रोडवर झाडांच्या फांद्या आल्याने वाहतूकीस होणारा अडथाळा याबाबत.
..अशा वरील मुख्य तीन विषयासंदर्भात आज मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले व लवकरात लवकर यावर अमंलबजावणी करून काम सुरू करावे असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लोणावळा शहर यांच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी,
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुणे जिल्हा महिला आघाडी सह-संपर्कप्रमुख श्रीमती शादान भाभी चौधरी, शिवसेना शहरप्रमुख श्री परेश बडेकर,मा.युवतीसेना अधीकारी सौ सना चौधरी साळुंके,महिला आघाडी संघटीका सौ. प्रतीभा कालेकर,शहर सल्लागार रामभाऊ थरकुडे, उपशहर संघटीका सुरेखाताई देवकर, उर्मिला शर्मा,शहर प्रवक्ते अनील कडु, शाखाप्रमुख जीतु ठोंबरे,अमित पंचमुख इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment