Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, July 22, 2025

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

एस व्ही सी एस हायस्कूल, बोरामणी येथे विद्यार्थ्यांना 1000 वह्यांचे मोफत वाटप.. 

सह्याद्री फाउंडेशन चा स्तुत्य उपक्रम.. 

सोलापूर (प्रतिनिधी)) आज प्रशालेत उळे गावचे उपसरपंच तथा सह्याद्री फॉउंडेषणचे संस्थापक, अध्यक्ष श्री नेताजी भाऊ खंडागळे* यांच्या 54 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने *1000 पेक्षा जास्त वह्यांचे वाटप* करण्यात आले. श्री नेताजी भाऊ खंडागळे हॆ सह्याद्री फॉउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक, शैक्षणिक कार्यें करत आहेत . शेतकरी कुटुंबात जन्मलेले व एक उद्योजक म्हणून यशस्वी राजकारणी म्हणून कार्य करत सामाजिक उत्तरदायित्व निभावणारे असे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा ध्यास असणारे ज्ञानसाधनेच्या मार्गातील अडथळे लक्षात घेऊन कार्य करणारे श्री नेताजी भाऊ खंडागळे.


याप्रसंगी पूज्य श्री वीरतपस्वी आणि तपोरत्नम योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन श्री नेताजी भाऊ खंडागळे, सरपंच राज साळुंखे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री केदार विभुते, सोसायटी चेअरमन वजीर मुजावर तंटामुक्ती अध्यक्ष रफिक मुजावर,केंद्र प्रमुख व्हनमाने सर, जि. प. प्रा. शाळा मुख्याध्यापक बणजगोळे सर, वैभव हलसगे, आकाश माशाळे, सैफन फुलारी, सुभाष भोसले, शिवराज विभुते, प्रकाश आवटे आदि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.


मुख्याध्यापक श्री अतनुरे सर यांनी महास्वामीजीनी आशीर्वादीत हार, शाल, अहवाल पुस्तिका देऊन श्री खंडागळे यांचा सत्कार केला.*

उपस्थित सर्व मान्यवरांच्या सत्कार, स्वागतानंतर *सह्याद्री फॉउंडेषण च्या वतीने मुख्याध्यापक श्री अतनुरे सर व पर्यवेक्षक श्री बिराजदार सर यांचा श्री  विठ्ठल रुक्मिणी ची मूर्ती देऊन सत्कार केला.


त्यानंतर सत्कार मूर्ती व वही भेट देणारे श्री खंडागळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

मुख्याध्यापक श्री अतनुरे सर यांनी श्री खंडागळे यांच्या कार्याचे कौतुक करत आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री प्रविण कुंभार सर यांनी केले.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment