Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, July 5, 2025

SARA NEWS NETWORK


 सारा न्यूज नेटवर्क - 

महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री मा.ना. श्री गिरीश महाजन यांचा आदिवासी पारधी समाजाच्या वतीने सत्कार.

 सोलापूर (प्रतिनिधी) :- आदिवासी पारधी समाज सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजातील प्रमुख पदाधिकारी  यांच्यावतीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन साहेब यांचा सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात सत्कार करण्यात आला.

 त्याचे प्रमुख कारण की आदिवासी समाजासाठी आयोग स्थापने साठी मोलाचे योगदान मंत्री महोदय श्री गिरीशजी महाजन साहेब केले असून सदर समिती मध्ये ते सदस्य असून भविष्यात आदिवासी पारधी समाजांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोलाचे प्रयत्न करणार आहेत. 

सदर आदिवासी पारधी समाज आयोग लवकरच स्थापन होऊन आदिवासी पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार यांना नोकरीची संधी मिळणार असून तसेच आर्थिक बाजू सक्षम होणार अशी ग्वाही माननीय मंत्री महोदय यांनी दिलेली आहे.

  सोलापूर जिल्ह्यातील व धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांनी मंत्री महोदय यांचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला.

त्याप्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे पूर्व अध्यक्ष शशिकांत चव्हाण, भाजपा शहराध्यक्ष रोहनीताई तडवळकर, थोर समाजसेवक पंडित भोसले, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नगरसेविका सौ राजश्री चव्हाण, भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश सचिव नकुल चव्हाण, आदिवासी पारधी विकास परिषद सोलापूर जिल्हा अध्यक्ष विजयकुमार काळे, सचिन शिंदे सर पंढरपूर, समाजसेवक कुंदन भोसले, सिद्धेश्वर शिंदे, देवाप्पा शिंदे,शांताबाई शिंदे,पत्रकार पिंटू पवार, भाजपचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण आदी उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment