सारा न्यूज नेटवर्क -
राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी सोलापूर शहर पदाधिकारी नियुक्ती..
सोलापूर (प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मा. अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष मा.सुनील तटकरे साहेब, युवती प्रदेशाध्यक्ष मा. संध्याताई सोनवणे यांचे विचार सर्व सामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी व सोलापूर शहराध्यक्ष संतोष भाऊ पवार , कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान, माजी नगरसेवक नारायण माशाळकर यांच्या मार्गदर्शना खाली शहर युवती पदाधिकारी ची निवड करण्यात आली.महानगरपालिका निवडणुका डोळ्या समोर ठेऊन पक्ष बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी युवती अध्यक्ष किरण दिदी माशाळकर यांनी नवीन युवतींची नियुक्ती केली. युवती उपाध्यक्ष योगिता मुळे, उपाध्यक्ष संजना आचलकर ,सरचिटणीस गौरी लिगाडे , सरचिटणीस श्रीदेवी शिवशरण , सहसचिव भाग्यश्री कोकणे , उत्तर विधानसभा अध्यक्ष रुचिका जमदाडे ,मध्य विधानसभा अध्यक्ष सानिका गंतेलू . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व सर्व पदाधिकारी यांनी युवतींना शुभेच्छा दिल्या.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment