सारा न्यूज नेटवर्क -
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी विभागाच्या शहर उपाध्यक्ष पदी चैताली क्षीरसागर यांची निवड...
सोलापूर (प्रतिनिधी) :- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या आदेशान्वये महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार व कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली अजित दादांचे हात बळकट करण्यासाठी महिला आघाडी शहराध्यक्ष संगीता जोगधनकर यांनी गुरुवारी दोन नूतन महिला आघाडी विभागाच्या कार्य करण्याची निवड केली .
यामध्ये शहर उपाध्यक्षपदी चैताली क्षीरसागर यांची निवड करण्यात आली.
शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार व कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या शुभ हस्ते क्षीरसागर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
या निवडीनंतर शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार,कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर यांनी क्षीरसागर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या....
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment