Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, July 22, 2025

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ( सामाजिक न्याय विभाग ) सोलापूर जिल्हा शहर कार्याध्यक्ष पदावर शत्रुघ्न कांबळे यांची निवड.. 


सोलापूर (प्रतिनिधी) :- मौजे तपकिरी शेटफळचे सोलापूरस्थित सामाजिक कार्यकर्ते विविध संघटनावर कार्यरथ असणारे शत्रुघ्न कांबळे (सर ) यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ( सा. न्या.) सोलापूर जिल्हा शहर कार्याध्यक्ष पदावर निवड झाली . मागील दीड वर्षापासून ते राष्ट्रवादी पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहात होते . श्रीयुत कांबळे सरांचा दांडगा जनसंपर्क विविध क्षेत्रातील काम व पक्षावरील एकनिष्ठतेची पक्षाचे दखल घेवून त्यांना एक प्रकारे बढती देवून कार्याध्यक्ष पदाचा मान दिला आहे . श्रीयुत कांबळे सर यांचे विविध NGO मार्फत मोठे सामाजिक काम आहे . सार्वजनिक ग्रंथालय बालसंगोपन योजना तसेच राज्य स्तरावर निरिक्षणगृह / बालगृह कर्मचारी संघानेचे ही ते काम करतात गेल्या दोन वर्षामध्ये तेथील कर्मचाऱ्यांना नियमीत वेतन आश्वासित प्रगती योजना शिक्षक संर्वगास चटोपाध्याय आयोग लागू करण्यात त्यांची मोलाची भूमिका आहे. सोलापूर जिल्हयातील ४०० एकलपालक बालकांना महिला व बालविकास विभागाची " क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले " बालसंगोपन " योजना ते अतिशय प्रभावीपणे राबवत आहेत. श्रीयुत कांबळे सरांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून केंद्र शासनाच्या मनुष्य विकास व युवा क्रीडा विकास मंत्रालयाने जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानीत केले आहे . ते सामाजिक चळवळींत नेहमी सक्रीय असतात.

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष श्री संतोष भाऊ पवार  यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (सा न्या ) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा . सुनिल मगरे सरांकडे श्री कांबळे सरांच्या कार्याची दखल घेवून पक्षामध्ये कार्याध्यक्ष पदावर निवडीसाठी शिफारस केली  होती  त्यांच्या शिफारशी ची दखल घेवून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाची मोठी जबाबदारी दिली आहे . 


कालच्या सोलापूर दौऱ्याच्या वेळी प्रा मगरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या . या निवडीसाठी कार्याध्यक्ष श्री . अनिल बनसोडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले . या निवडी निमित समाजाच्या विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे .

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment