सारा न्यूज नेटवर्क -
पुणे येथे सामाजिक कार्याचा महाराष्ट्ररत्न पुरस्कार 2025 हा पुरस्कार संतोष गायकवाड यांना देऊन सन्मानित केले..
पुणे (प्रतिनिधी) :- आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन पुणे आयोजित समाजातील कर्तुत्वार्थ व्यक्तींचा सन्मान सोहळा महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2025 सामाजिक कार्य हा पुरस्कार गळ्यात पदक सन्मानपत्र सन्मान चिन्ह देऊन जीके मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्था सोलापूर संस्थापक अध्यक्ष संतोष दादा गायकवाड यांना पुणे येथील स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह फुले रोड शिवाजीनगर पुणे येथे समाज रत्न पुरस्कार सोहळा पार पडला.
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थित मराठी सिनेतारका फालगुनी झेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंदी फाउंडेशनचे गणेश विटकर तसेच उद्योगपती राजेंद्र राऊत साहेब यांच्या उपस्थितीत असंख्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली या कार्यक्रमाप्रसंगी समाजातील डॉक्टर वकील सामाजिक कार्य करणारे कला क्रीडा साहित्य कवी अशा असंख्य मान्यवरांना पुणे येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
गेल्या आठ वर्षापासून जीके मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्था जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम घेऊन आपल्या कार्याचा ठसा अखंडित चालू ठेवलेला आहे संस्थेला हा पाचवा पुरस्कार मिळालेले सर्व मित्र परिवार व पदाकरी पदाधिकारी यांच्याकडून जीके संस्थेचे अध्यक्ष संतोष दादा गायकवाड यांना शुभेच्छा चा वर्षा होत आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे


No comments:
Post a Comment