सारा न्यूज नेटवर्क -
महा एनजीओ फेडरेशन व इको नेचर क्लब यांच्या माध्यमातून गोशाळेत वृक्षारोपण उपक्रम संपन्न..
सोलापूर(प्रतिनिधी) : - महा एनजीओ फेडरेशन व इको नेचर क्लब यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसामुळे व शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिवसानिमित आयोजित वृक्षारोपण उपक्रम गोपालक संघ गोशाळा नेहरूनगर येथे संपन्न झाला.
यावेळी सोलापूर ग्रामीणचे पोलिस उपअधिक्षक विजयालक्ष्मी पुरी, महा एनजीओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव, इको नेचर क्लब मुख्य प्रवर्तक व पर्यावरण दूत डॉ मनोज देवकर, गोशाळा महासंघचे महेश भंडारी आणि प्रकाश वैद्य, महेश देवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
संचालक अमोल उंबरजे म्हणाले की महा एनजीओ फेडरेशन आयोजित व संस्थापक शेखर मुंदडा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील ५५ सामाजिक संस्थांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आपण जवळपास ३०० हून अधिक गोशाळेत वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात येत आहे. हरित सेवा आणि गोसेवा अशा दोन्ही सेवांना जोडण्यासाठी असे उपक्रम राबवित आहोत. महा एनजीओ फेडरेशनचे जिल्हा समन्वयक पर्यावरण दूत डॉ मनोज देवकर म्हणाले की, सोलापुरात खूप मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणची गरज आहे त्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत. त्यामुळे असे उपक्रम राबविन्या साठी आम्ही नेहमी पुढाकार घेत असतो.
गोसेवा ही महत्वाची सेवा आहे आणि त्याला जोड हरित सेवेची मिळत आहे आणि अश्या उपक्रमातून अनेक सेवांना चालना मिळते असे पोलिस उपअधीक्षक पुरी यांनी यावेळी आपल्या भाषणात म्हटले.
यावेळी पशुसंवर्धन खात्याचे डॉक्टर गिड्डे राम हुंडारे, विजय जाधव, अभिषेक उंबरजे, उद्योजक लक्ष्मण कोळी, मदन पवार, राजेंद्र असादे, गणेश माने, महिला समन्वयक अश्विनी भोसले, उमा दिगीनाल, संजय पाल, मुख्याध्यापक कार्तिक चव्हाण सर , कपिल कोळी, राजेश वडलेश्वर उपस्थित होते. गोसवंर्धन दिन व गोशाळा मध्ये गोमातांची पूजा करून त्यांना चारा देऊन ,विशेष गोशाळेमध्ये देशी व औषधी वृक्ष लागवड करण्यात आली कादंब कडुलिंब करंज आवळा अशा देशी वृक्षाची लागवड होत आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment