सारा न्यूज नेटवर्क -
ग्रामसभा न घेता बनावट अभिलेखे तयार करून नागरिकांची व प्रशासनाची फसवणूक केल्याबाबत..
तुळजापूर (प्रतिनिधी) :- ग्रामपंचायत कार्यालय वडगांव (काटी) सरपंच, ग्रामसेवक व इतर सदस्य , कर्मचारी यांनी ग्रामसभा न घेता बनावट अभिलेखे तयार करून नागरिकांची व प्रशासनाची फसवणूक केल्याबाबत व ग्रामसेवकांनी कार्यकाळ नसताना अगोदरच्या वर्षातील बोगस बनावट अभिलेखे बनवल्याचे दिसून आल्यामुळे निलाबाई काशिनाथ डोके (ग्रामपंचायत सदस्या) यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय तुळजापूर यांच्याकडे लेखी तक्रार करून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
त्यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पदाधिकारी निलेश केवट, नागनाथ माळी, सूर्यकांत कांबळे, गणेश कांबळे, शाहू साखरे, गोडसे सर व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चे पदाधिकारी गणेश पाटील साहेब दत्तात्रय सोनवणे साहेब सारिका चुंगे दत्तात्रय डोके व ग्रामस्थ उपस्थित होते गट विकास अधिकारी दिलेल्या तक्रारी अर्जावर काय कारवाई करतील याकडे वडगांव (काटी)तील सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे


No comments:
Post a Comment