Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, July 18, 2025

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सम्यक क्रांती मागासवर्गीय बहु संस्थेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन व सर्व रोग निदान व रक्तदान शिबीराचे आयोजन.. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- सम्यक क्रांती मागासवर्गीय बहु संस्था कमला नगर सुशिल नगर जय भिम चौक सोलापूर च्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त युवा उद्योजक सोनाई फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय युवराज भैय्या राठोड यांच्या हस्ते पुजा करून अभिवादन करण्यात आले व मंडळाच्या वतीने सर्व रोग निदान व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. 


शिबीरामध्ये बिपी शुगर रक्त डोळे व दंत तपासणी व इसीजी काढणे व औषधी मोफत देण्यात आले रक्तदानास कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. 


कार्यक्रमास किशोर चंदनशिवे भास्कर देडे सागर साबळे मल्लेश सुर्यवंशी मिथुन कोडुर अतुल गायकवाड अभिजीत गायकवाड अनुराग देडे सम्राट गायकवाड गौतम गायकवाड मुन्ना कोडुर बंडु जाधव गणी शेख उत्सव अध्यक्ष नागेश कांबळे संजय खंदारे पप्पू गायकवाड मोहन पवार सुधीर बोराडे कांबळे साहेब समीर शेख बाळु राठोड नितीन पवार सुरेश जाधव रवी रणदिवे  मेडीकल टिम व परीसरातील नागरिक बहु संख्येने उपस्थित होते 

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment