सारा न्यूज नेटवर्क -
मुला मुलींच्या सुरक्षिततेसाठी यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मध्ये "सखी सावित्री" समितीची स्थापना.
सोलापूर(प्रतिनिधी) :- येथील चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनियर कॉलेजमध्ये सखी सावित्री समितीची स्थापना करण्यात आली.राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला मुलींच्या सुरक्षेतेसाठी व निकोप आणि सुरक्षित वातावरण निर्मितीसाठी शासन स्तरावर सखी सावित्री समितीचे गठन करण्यात येते. आज प्रशालेमध्ये शाळा स्तरावरती सखी सावित्री समितीचे गठन करण्यात आले.यामध्ये माता पालिका तसेच परिसरातील वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित महिला, दामिनी पथक, अंगणवाडी सेविका, समुपदेशक व्यक्ती,अशा महिला प्रतिनिधींना एकत्र करून सहविचार सभा घेण्यात आली.या सहविचार सभेमधून सर्वानुमते सखी सावित्री समितीची पुढील प्रमाणे स्थापना करण्यात आली.
अनुगीता अशोक पवार [अध्यक्षा,शाळा व्यवस्थापन समिती ],कु.अर्चना सदाशिव यलगुलवार
[ महिला शिक्षक प्रतिनीधी] श्री.अस्लम अब्दुलसत्तार मुलाणी [ समुपदेशक],सौ.विशाखा कांबळे [ पोलिस, दामिनी पथक],सौ.नंदा जनार्दन मोती [ आंगणवाडी सेविका]सौ. गीता मधुकर सुरवसे [ वैयकिय क्षेत्र- नर्स]
सौ.वैशाली सुनिल आयवळे [ महिला पालक प्रतिनीधी],कु. त्रिशा सिद्राम म्हेत्रे,कु. आहिल्या रामचंद्र माने,चि.रुद्र मोहन गायकवाड,चि.राज महेश सुखसे [विद्यार्थी - विद्यार्थीनी प्रतिनिधी]
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनचे प्रोग्राम ऑफिसर श्री.वीरेंद्र परदेशी सर, प्राचार्या सीमा-श्रीगोंदेकर यलगुलवार, पर्यवेक्षक डॉ.बंडोपंत पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.अर्चना यलगुलवार यांनी केले तर आभार प्रा.अर्चना अडसूळ यांनी मानले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment