Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, July 16, 2025

SARA NEWS NETWORK


सारा न्यूज नेटवर्क - 
पंढरपूर आषाढी वारीतील उत्कृष्ट नियोजनासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा पत्रकार कृती समितीच्या वतीने गौरव..

सोलापूर (प्रतिनिधी): -पंढरपूर आषाढी वारी २०२५ दरम्यान प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उत्कृष्ट नियोजन आणि वारकऱ्यांसाठी अंमलात आणलेल्या सुसंगत सेवांबद्दल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा ‘पत्रकार कृती समिती’व आप्पाश्री लंगोटे मित्रपरिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला.या वेळी आयोजित कार्यक्रमात समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शाल,बुके व विठ्ठल-रुक्माईची प्रतिमा देऊन जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव केला.


वारी व्यवस्थापन, वाहतूक नियोजन, पाणीपुरवठा, आरोग्य व्यवस्था आणि वारकऱ्यांना दिलेली तत्पर मदत याबाबत सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.कार्यक्रमात बोलताना समिती सदस्यांनी सांगितले की,
“या वर्षी जिल्हा प्रशासनाच्या कार्यकुशलतेमुळे वारी अत्यंत शांततापूर्ण, सुगम आणि सुरक्षित वातावरणात पार पडली. याचे श्रेय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाला जाते.”


जिल्हाधिकारी यांनी यावेळी आपल्या मनोगतात म्हटले की,“वारी म्हणजे फक्त एक धार्मिक यात्रा नव्हे, तर ती एक सामाजिक जबाबदारी आहे. हा सन्मान म्हणजे संपूर्ण प्रशासन आणि पथकासाठी प्रेरणादायी आहे.”


यावेळी पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अब्दुल रहिम पठाण, उपाध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे, सैफन शेख,विजयकुमार उघडे, शब्बिर मनियार, युनूस अत्तार,अकबर शेख,इरफान मंगलगिरी,सिध्दार्थ भडकुंबे,राम हुंडारे, उपेंद्र गायकवाड,गणेश भालेराव,नितीन करजोळे,रमजान मुलाणी आदी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment