Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, July 11, 2025

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

आई-वडिलावरती प्रेम करणारी पिढी निर्माण करू या - प्रकाश राठोड , मा.सहाय्यक आयुक्त....

तीर्थक्षेत्र गोरपिठ, प्रतापनगर, सोलापूर येथे  अनेक मुलानी आई-वडिलांची पूजा करून गुरू पौर्णिमा साजरी करण्यात आली...


सोलापूर (प्रतिनिधी) :- या संपूर्ण विश्वाला अनादी काळापासून लाभलेली ही गुरु परंपरा आजतागायत जिवंत आहे. म्हणजे आपण शिष्य आहोत तर आपले गुरु कोणी तरी आहे. मग आपल्या गुरूंचे गुरु आहेत, त्या गुरूंचे कोणी तरी गुरू आहे. म्हणजे ही गुरूंची परंपरा कोणापासून सुरू झाली किंवा पहिले गुरु कोण हे संशोधनीय आहे. असो ठीक आहे परंतु आपण जन्माला आल्यानंतर ज्यांनी हे जग दाखविले, संस्कार घडविले त्यांच्या अनुभवातून धडे दिले, अशी मायेची ऊब देणारी वंदनीय मूर्ती म्हणजे आपले आई वडील हे प्रथम गुरू आहेत. पण आजची स्थिती पाहता आजच्या काळात मुलं आई वडिलांचा सांभाळ करत नाही. त्यांच्याकडे बघत नाही, त्यांची कदर करत नाही. किंवा नोकरीच्या निमित्ताने आई वडीलांना गावी ठेऊन बाहेर गावी निघून जातात. 


अशांसाठी प्रकाशभाऊ राठोड यांनी एक उद्गार काढले की युवकांनी आपल्या आई वडीलांना सन्मान द्यावा.त्यांची सेवा करावी, खूप प्रेम द्यावे, आई वडिलांची काळजी घ्यावी. आई वडिलांविषयी खूप स्वाभिमान बाळगावं. अशी आई वडिलांची सेवा करणारी पिढी घडवूया असे विधान यावेळी माजी सहाय्यक आयुक्त श्री.प्रकाशभाऊ राठोड यांनी केले. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आई वडिलांची पूजा करणे ही परंपरा प्रत्येक गुरुपौर्णिला साजरी करावी असेही सांगितले.अनेकांनी गोरपिठ येथे आपल्या आई वडिलांना घेऊन आले.त्यांचे चरण धुवून पुष्प अर्पण केले.असे आदर्श सर्वांनी घ्यावे आई वडिलांविषयी कृतज्ञता बाळगावी. ही गुरु परंपरा कायम जपावी असे सांगितले.

               सेवा फाउंडेशनच्या वतीने काल गुरु पौर्णिमेच्या शुभ दिनी तीर्थक्षेत्र गोरपिठ प्रतापनगर तांडा सोलापूर येथे गादीश्वर प.पू.मोतायाडी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये लहान थोरांनी प्रथम गुरू असलेल्या आपल्या आई वडिलांची मनोभावे पूजा करून गुरु पौर्णिमा साजरी केली.त्याच बरोबर आदिशक्ती माता, संत सेवालाल महाराज, संत हामुलाल महाराज, राष्ट्रसंत रामराव बापू, संत हुनाबापू या सर्व देवी देवतांचे देखील पूजा अर्चा करण्यात आली. अतिशय भक्तिमय आणि आनंदी वातावरण दिसून आला.

     यावेळी सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष माजी सहाय्यक आयुक्त श्री.प्रकाशभाऊ राठोड यांच्या सह विविध मान्यवर उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment