Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, July 29, 2025

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

प्रभाग क्रमांक 26 मधील उद्धव नगर भाग एक येथे श्री लक्ष्मी समर्थ मंदिर प्रांगणात नागपंचमी निमित्तानं झोका बांधून नगरसेविका सौ.राजश्री चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन.

सोलापूर (प्रतिनिधी) :- दिनांक 29 जुलै रोजी महिलांचा महत्त्वकांक्षी व आनंदाचा क्षण म्हणजेच नागपंचमी सण यानिमित्ताने प्रत्येक घरात नागोबाची पूजा करून आदल्या दिवशी भावासाठी उपवास करीत असतात. श्रावण महिन्यात पहिला सोमवार हा महत्त्वाचा मानला जातो पुराण काळापासून ह्या दिवसाचे महत्त्व असते म्हणूनच भारतीय संस्कृतीत प्रत्येक महिला नागपंचमीचा सण आल्यामुळे रात्रभर आपल्या घरात मेहंदी हाताला लावून घेत असतात तसेच नागपंचमी सणासाठी नागोबाचा आवडता पदार्थ, म्हणजेच पुरणपोळीने बनवलेली करंजी,असे अनेक पदार्थ करून रातभर मोकळ्या जागेत पिंगा फुगडी खेळून फेर धरून गाणी म्हणत असतात त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. 



नागपंचमीचे अवचित साधुन जुळे सोलापुरातील उद्धव नगर भाग एक येथील प्रसिद्ध जागृत मंदिर म्हणून संबोधले जाणारे श्री लक्ष्मी समर्थ मंदिर प्रांगणात झोका बांधून त्याचे उद्घाटन प्रभाग 26 च्या कर्तव्यदक्ष,जनतेच्या मनातील, लोकप्रिय नगरसेविका सौ राजश्री चव्हाण  व सौ.प्राप्ती आकाश अलकुंटे शुभ हस्ते उद्घाटन सोहळा मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात करण्यात आला त्याप्रसंगी श्री लक्ष्मी समर्थ ग्रुपच्या सर्वेसर्वा सौ.ज्योतीताई मनोजकुमार अलकुंटे, योग शिक्षिका सौ.स्वाती शिंदे, सौ अर्चना अचलेर, सौ.अनिता माने, पुजारी काकू, व श्री लक्ष्मी समर्थ ग्रुप मधल्या सर्व सेवेकरी महिलावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment