सारा न्यूज नेटवर्क -
संत रोहिदास महाराज समाजसेवा संघ कामशेत शहर च्या वतीने श्रावणमास निमित्त सत्यनारायण महापूजा व सत्कार सोहळा कार्यक्रम संपन्न....
---------------------------------
मावळ प्रतिनिधी : रविवार दिनांक २७/०७/२०२५ रोजी सालाबाद प्रमाणे याही वर्षी संत रोहिदास महाराज समाजसेवा संघ कामशेत शहर अध्यक्ष रमेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक २७/०७/२०२५ श्री संत रोहिदास महाराज मंदिर कामशेत या ठिकाणी संत रोहिदास समाजसेवा संघ कामशेत शहर यांच्या वतीने श्रावण मास निमित्त "श्री सत्यनारायण महापूजा" व अभिषेक, करण्यात आला.
पूजेचे अवचित साधून संत रोहिदास महाराज मंदिर कामकाजासाठी कामशेत ग्रामपंचायतच्या माध्यमातून मंदिराचे शुशोभीकरण करण्यासाठी निधी मिळाल्याबद्दल व त्या निधीतून मंदिराचे शुशोभीकरण पूर्ण झाल्याबद्दल ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक, सरपंच, सदस्य व ठेकेदार यांचा सत्कार करण्यात आला. व तसेच मावळ तालुका खादी ग्रामोद्योग चेअरमन पदी सलग पाचव्यांदा मा. अंकुशभाऊ आंबेकर यांची निवड तर संचालक पदी मा. सुरेश जाधव, मा. छबुराव गायकवाड यांची बिनविरोध निवड तसेच मा. अमोल गायकवाड यांची शिवशाही महाराष्ट्र राज्य व्यापारी संघ कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सर्वांनां सन्मानित करण्यात आले,
तसेच आज पर्यंत केलेल्या समाजाप्रती, समाजकार्यांची दखल घेत कामशेत मधील ज्येष्ठ नागरिक समाज बांधव व भगिनी यांना ही सत्कार करून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला चेअरमन अंकुश भाऊ आंबेकर व कार्याध्यक्ष अमोल भाऊ गायकवाड यांनी उपस्तिथ समाज बांधव व भगिनीं यांना संबोधित केले. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रमुख सल्लागार अनिल कदम साहेब यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संत रोहिदास चॅरिटेबल ट्रस्ट मावळ चे अध्यक्ष श्री दिनेश जाधव साहेब व खजिनदार दत्ताभाऊ शिंदे साहेब यांनी केले तसेच आलेल्या पाहुण्याचे आभार अध्यक्ष रमेश भाऊ शिंदे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे व महिला अध्यक्षा गौरी अमोल शिंदे यांनी केले.
आयोजक
श्री संत रोहिदास महाराज समाज सेवा संघ कामशेत शहर
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे






No comments:
Post a Comment