सारा न्यूज नेटवर्क -
इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत शालेय परिसरात वृक्षारोपण .
सोलापूर (प्रतिनिधी) :- जुळे सोलापुरातील श्री एस बी प्राथमिक शाळा येथे इको क्लब फॉर मिशन लाइफ अंतर्गत जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून एक पेड मां के नाम या या शासनाच्या थीमनुसार शालेय परिसरात विद्यार्थ्यांना समवेत वृक्ष लागवड व प्रत्येक विद्यार्थ्यांना रोप भेट देण्यात आले. सदर या उपक्रमात जुळे सोलापुरातील सामाजिक कार्यकर्ते श्री परमेश्वर माळगे व पर्यावरण दूत डॉ मनोज देवकर यांच्या सहकार्याने २०० झाडांची रोपांची उपलब्ध करण्यात आली.तसेच सामाजिक वनीकरण येतील वन अधिकारी शिला बडे मॅडम यांचेही मार्गदर्शन लाभले .
इको नेचर क्लबचे मुख्य प्रवर्तक व पर्यावरण दूत डॉ. मनोज देवकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पर्यावरणाविषयी अनमोल माहिती दिली. व विद्यार्थ्यांनी प्रत्येक झाड आईचे नावे आपल्या दारी लावून त्याचे जे विद्यार्थी संवर्धन करतील त्यांना पर्यावरण पूरक भेट ही देण्यात येईल असेही सांगितले.
मुख्याध्यापक श्री मोहिते सतीश यांनी इको क्लब मिशन फॉर लाईफ याची माहिती ही विद्यार्थ्यांना दिली व शासनाच्या निर्देशानुसार शालेय समितीमध्ये इको क्लब ही समिती स्थापन करण्यात आली.श्री वाड दरेकर सर यांनी सूत्रसंचालन केले तसेच हा उपक्रम जुळे सोलापूर आतील सामाजिक कार्यकर्ते श्री परमेश्वर माळगे यांनी पुढाकार घेतला आहे .
जागतिक पर्यावरण दिन 2025 व निसर्ग हाच गुरु ध्येय साधून गुरुपौर्णिमेच्या दीनी शिक्षकांच्या संकल्पनेतून
जुळे सोलापुरातील सर्व पर्यावरण प्रेमी विद्यार्थी वर्ग शिक्षक वर्ग एकत्रित येऊन हरित जुळे सोलापूर करण्याचा निर्धार ही केला आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे



No comments:
Post a Comment