Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, July 16, 2025

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

हॅलो मेडिकल फाउंडेशन आणि दाराशा यूपीएचसी यांच्या संयुक्त विद्यमाने नवविवाहित जोडप्यांसाठी समुपदेशन.. 


सोलापूर (प्रतिनिधी) :- हॅलो मेडिकल फाउंडेशन, संपूर्ण प्रकल्प आणि दाराशा यूपीएचसी यांच्या संयुक्त विद्यमाने नवविवाहित जोडप्यांसाठी समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १६ जुलै रोजी करण्यात आले होते. याप्रसंगी ६७ नवविवाहित जोडपी या सामाजिक उपक्रमात सहभागी झाली होती. प्रारंभी पत्नीने पतीला  गुलाबपुष्प आणि पतीने पत्नीला गजरा भेट देऊन त्यांच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 


डॉ. बालगावकर यांनी नवविवाहित जीवनातील परस्पर समज, एकमेकांच्या भावना जाणून घेण्याचे महत्त्व विषद केले.

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. लहांडे यांनी लग्नानंतर किमान एक वर्ष एकमेकांना समजून घेण्याची गरज तसेच बाळंतपणामध्ये सुरक्षित अंतराचे आरोग्यदृष्ट्या फायदे समजावून सांगितले.


दाराशा यूपीएचसीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चौगुले यांनी नवविवाहितांसाठी समुपदेशन सत्र कसे मार्गदर्शक ठरते हे स्पष्ट केले.

मेट्रन डबिन मॅडम यांनी 'लेक वाचवा, लेक शिकवा', 'छोटं कुटुंब सुखी कुटुंब' आणि 'मुलगा-मुलगी समान' या सामाजिक संदेशांवर भर दिला.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका कांबळे यांनी केले. यावेळी दाराशा सेंटरच्या लोधी गल्ली भागातील आशा वर्कर्सना संपूर्ण प्रकल्पामार्फत आरोग्य किटचे वाटप करण्यात आले.


या कार्यक्रमाचे नियोजन प्रकल्पाचे समन्वयक जावेद शेख यांच्या अध्यक्षतेखाली प्रियंका कांबळे यांनी केले. यावेळी दाराशा सेंटरच्या पीएचएन अस्मिता खडतरे, प्रकल्पातील पल्लवी माने, कविता बनसोडे आणि दाराशा यूपीएचसीचा संपूर्ण स्टाफ यांनी सक्रिय सहभाग घेतला.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment