Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, July 26, 2025

SARA NEWS NETWORK


 सारा न्यूज नेटवर्क - 

"एक राखी सैनिक बांधवांसाठी" – सह्याद्री फाउंडेशनचा अनोखा उपक्रम.. 


सोलापूर, दि. २६ जुलै :-

कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून सह्याद्री फाउंडेशनतर्फे “एक राखी सैनिक बांधवांसाठी” हा प्रेरणादायी उपक्रम आजपासून सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी आपल्या प्रेमाच्या, अभिमानाच्या आणि कृतज्ञतेच्या भावना व्यक्त करत हातांनी बनवलेल्या राख्या थेट सीमेवर लढणाऱ्या आपल्या वीर जवानांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत.



सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष मा.नेताजी भाऊ खंडागळे यांनी या उपक्रमाची घोषणा करत सर्व शाळांतील विद्यार्थिनींना राखी पाठवण्यास आवाहन केले.

राखी पाठविण्याची अंतिम तारीख: १ ऑगस्ट २०२५, शुक्रवार

विद्यार्थिनी, पालक व शिक्षक यांना विनंती करण्यात येते की स्थानिक सह्याद्री फाउंडेशन प्रतिनिधींशी संपर्क साधावा.


सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे



No comments:

Post a Comment