सारा न्यूज नेटवर्क -
नवी मुंबई माथाडी कामगार बांधवांकडून कार्यसम्राट आमदार मा.श्री.सचिन दादा कल्याणशेट्टी यांचा नागरी सत्कार...!
नवी मुंबई (प्रतिनिधी) :- श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, माथाडी कामगार आणि अक्कलकोट रहिवासी वर्ग यांच्या वतीने नवी मुंबईतील भाजीपाला मार्केट येथे लोकप्रिय कार्यसम्राट पाणीदार आमदार मा.श्री.सचिन दादा कल्याणशेट्टी यांचा सत्कार करण्यात आला होता. याप्रसंगी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष व माथाडी कामगार नेते श्री. नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या आदरपूर्वक सन्मान सत्काराचा स्वीकार केला. यावेळी उपस्थित असलेल्या माथाडी कामगार बांधवांसोबत संवाद साधला.
या संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून माथाडी कामगारांच्या अडचणी व त्यांच्या गरजा जाणून घेतल्या. तसेच माथाडी कामगार बांधवांच्या हक्कांसाठी कायम तुमच्या सोबत आहे, असा विश्वास व्यक्त केला. यासोबतच, कामगारांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध असल्याचेही आश्वस्त केले.
या कार्यक्रमास माथाडी संघटनेचे संयुक्त सरचिटणीस श्री. रविकांत पाटील, बाजार समिती संचालक श्री. शंकर पिंगळे, तसेच कार्यक्रमाचे आयोजक आणि स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. अशोक बिराजदार, श्री. पंडित सोडगी, श्री. आनंद पाटील, श्री. लक्ष्मीपुत्र बिराजदार, श्री. राजकुमार जमादार, श्री. सिद्धाराम संगपाळ, लिंगायत महासंघाचे प्रा. नीलकंठ बीजलगावकर व इतर व्यापारी आणि कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment