सारा न्यूज नेटवर्क -
पंडित नेहरु विद्यालय कामशेत जुनिअर कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी..
कामशेत (प्रतिनिधी) :- दि.१० जुलै २०२५ रोजी पंडित नेहरु विद्यालय कामशेत जुनिअर कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी कार्यक्रमाच्या *अध्यक्षस्थानी* विद्यालयाच्या *प्राचार्या सौ. धनश्री साबळे* , *प्रमुख पाहुणे* म्हणून *उपप्राचार्या सौ. उषाराणी बामणे* , ज्युनिअर विभागाचे *विभाग प्रमुख श्री. संदिप बोंबले* तसेच सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांना फुलं अर्पण करत कृतज्ञता व्यक्त केली. यानंतर विद्यार्थ्यांनी गुरुप्रेम, संस्कार आणि शिक्षकांचा सन्मान या विषयांवर भाषणं, चारोळ्या आणि गीत सादर केली. त्यानंतर प्राध्यापकांच्यावतीने *प्रा.श्री. सुभाष पिंपळे* यांनी गुरुंचे महत्त्व या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. *प्रमुख पाहुणे सौ.बामणे मॅडम* यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचा वाटा या विषयावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या *अध्यक्षा सौ.साबळे मॅडम* विद्यार्थ्यांना गुरुंचा सन्मान करण्याचा संदेश दिला. या कार्यक्रमाला प्राध्यापक *श्री.पवार, श्री.कसबे, श्रीमती गोत्रे, श्रीमती कचरे, श्रीमती गायखे, श्रीमती पावरा, श्रीमती पाटिल, श्रीमती निंबळे, सौ.चोपडे* देखील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे👩💼 *सूत्रसंचालन* इ.१२वी वाणिज्य ब वर्गातील विद्यार्थीनी *कु.सानिका काजळे* हिने, 👩🏫 *प्रास्ताविक* इ.१२वी वाणिज्य ब वर्गातील विद्यार्थीनी *कु.अर्पिता म्हस्के* हिने, तर 🙏 *आभार प्रदर्शन* इ.१२वी कला वर्गातील विद्यार्थीनी *कु. साक्षी जायभाय* हिने केले. संपुर्ण कार्यक्रमाचे *आयोजन* *सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सौ.कविता गायकवाड* आणि *प्रा.श्रीमती. पुजा धनवटे* यांनी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने केले. कार्यक्रमाचे 🖥️ *डिजीटल नियोजन* *प्रा. श्री. निलेश हुलवळे* तर 📷 *चित्रिकरण* *प्रा. श्रीमती. निशा मोरमारे* यांनी केले.कार्यक्रमास *सहाय्यक श्री खोल्लम नाना* व *श्रीमती अडसुळ* यांनी केले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताने झाली.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे



No comments:
Post a Comment