सारा न्यूज नेटवर्क -
सुनिल काळे यांची पुणे प्रादेशिक संघटक पदी बिनविरोध निवड.
बारामती (प्रतिनिधी) :- विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन (१०२९) पुणे प्रादेशिक कार्यकारिणी निवडीची बैठक संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व संघटनेचे केंद्रीय सरचिटणीस रविंद्र देवकांत यांच्या प्रमुख उपस्थितीत बारामती येथे पार पडली.
सदर बैठकीमध्ये सुनिल काळे यांची पुणे प्रादेशिक संघटक पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
याप्रसंगी रविंद्र देवकांत, बाळासाहेब गायकवाड, कल्याण धुमाळ, तानाजी चटके, उत्तरेश्वर स्वामी, अजीम चौधरी, वसंत कुंभार, शरणबसप्पा सोनकांबळे, शुकुर शेख, आप्पासाहेब घायतिडक, हणमंत जाधव, बशीर तांबोळी, दत्तात्रय खुडे, राम चव्हाण, बाबासाहेब शिंदे, सूर्यकांत मिरजे, दत्तात्रय माहूरकर, भरत लोखंडे, विनायक साळुंखे, जैनुद्दीन आत्तार, सुनिल गडकरी यांच्यासह पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, बारामती, कराड येथील इतर पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment